रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल च्या वतीने अॅनिमिया तपासणी व उपचार शिबीर संपन्न
1 min read
बेल्हे दि.११:- श्री बेल्हेश्वर विद्यालय, बेल्हे येथे रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल यांच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आधुनिक स्कॅनिंग मशीनद्वारे राबविण्यात आलेल्या अॅनिमिया (रक्तअल्पता) तपासणी व उपचाराचे शिबीर पार पडले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची लवकर तपासणी व योग्य उपचार हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमास रोटरी अध्यक्षा सोनाली गांधी, वेदप्रकाश कनसे, अभिषेक भागवत, विजयकुमार आहेर, हेमंत वाव्हळ, अक्षय शिंदे, सागर लामखडे, रायचंद गांधी, अतुल गांधी, विश्वनाथ डावखर, सुमित सदाशिव बोरचटे, प्रदीप पिंगट,
विद्यालयाचे मुख्याध्यापक पडवळ सर यांची उपस्थिती लाभली.विद्यार्थ्यांच्या आरोग्य व कल्याणासाठी सातत्याने सहकार्य केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल यांचे मनःपूर्वक आभार मानले.
