सूर्या करिअर अकॅडमीत मिनी पोलीस भरती महाडेमो संपन्न

1 min read

आळेफाटा दि.११:- महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेली सूर्या करिअर अकॅडमी आळेफाटा (ता.जुन्नर) येथे मिनी पोलीस भरती महाडेमो चे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दि.१० जानेवारी रोजी ही प्रक्रिया सुरळीत पार पडली.या वेळी उमेदवारांची मैदानी चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात आली.या वेळी नॅशनल कोच अंकित कुमार सिंह (झारखंड), सूर्य करिअर अकॅडमी चे संचालक श्रीकांत मदने, नायब तहसीलदार सचिन मुंडे, यूपीएससी एमपीएससी मार्गदर्शक राजेंद्र भराटे, समीर काकड, अण्णासाहेब काकड, तुषार कैचे यांस अनेक मान्यवर व कोच उपस्थित होते. महाराष्ट्रातील ६५० पेक्षा जास्त मुलामुलीं यामध्ये भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. मुलांमध्ये प्रथम क्रमांक जितेंद्र पवार, द्वितीय ओंकार टेमगिरे तर तृतीय क्रमांक अवधूत गोरडे याला मिळाला तरमुलींमधून प्रथम क्रमांक कोमल वाकचौरे, द्वितीय गवांदे अश्विनी, तर तृतीय तमनर शिवानी हिला मिळाला. या वेळी प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मुला मुलीस प्रत्येकी 5001, द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी 4001 व तृतीय क्रमांकासाठी 2501 एक रुपयाचं पारितोषिक देण्यात आले.शासकीय भरती प्रक्रिया ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे ही भरती प्रक्रिया आयोजित केली होती. यामध्ये सुजाता इन्फोटेक कंपनीच्या आधुनिक मशीन व सेन्सरद्वारे सर्व उमेदवारांची बारकोड द्वारे स्कॅनिंग करून मशीनद्वारे अचूक नंबर काढण्यात आले. शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये महाराष्ट्रात प्रथमच या महाडेमोचे सूर्या करिअर अकॅडमीने आयोजन करण्यात आले होते.अशी माहिती सूर्या करिअर अकॅडमीचे संचालक श्रीकांत मदने यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!