पुणे – नाशिक रेल्वेच्या या क्रांतीकारी लढ्यात सहभागी व्हा:- राहुल ढेंबरे पाटील

1 min read

संगमनेर दि.११:- पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचा असणारा रेल्वे प्रकल्प राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, अकोले, सिन्नर तालुक्यातुनच व्हावा यासह विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी बोटा (ता. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर) याठिकाणी संपूर्ण दिवसभरासाठी रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे, “आत्ता नाही तर कधीच नाही” म्हणून या विकासासाठीच्या क्रांतिकारक लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!