शेतकऱ्याच्याशेळ्या व बोकड चोरणारी टोळी गजाआड
1 min read
पुणे दि.१०:- वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत सदोबाचीवाडी परिसरात शेळ्या आणि बोकड चोरीला गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करीत तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पाच बोकड व दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला.
अजय उर्फ गोविंद सतीश होळकर (रा. मोहोळ ता. बारामती), आर्यन सचिन माने, (रा. निरगुडवाडी सदोबाची वाडी ता. बारामती) अणि शिवभान उर्फ बंटी नंदकुमार घोडके (रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गावाचा हद्दीतील इनामवस्ती होळ रोड येथील तक्रारदार संजय जगन्नाथ होळकर यांच्या घराच्या शेजारील गुरांच्या गोठ्यातील लोखंडी जाळी तोडून एक शेळी व चार बोकड अज्ञात चोरट्यानेचोरून नेल्याबाबत तक्रार प्राप्त झाली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना
तात्काळ रवाना करून घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक व गोपनीय माहिती आधारे संशयित अजय होळकर, आर्यन माने, आणि शिवभान उर्फ बंटी घोडके यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन यांच्याकडे सखोल चौकशी केली असता यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यांना सदर गुन्ह्याचा तपास कमी अटक करून न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली. त्यांच्याकडून तपासात होळ व सदोबाचीवाडी या परिसरातील चोरलेली एकूण पाच बोकड व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी अशा एकूण सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पोपट नाळे हे करीत आहेत.
