आणे येथे जलसंधारण विकास कामांचा शुभारंभ

1 min read

आणे दि.७:- उपजीविका विकासासाठी जल संसाधन विकास या प्रकल्पाअंतर्गत जुन्नर तालुक्यात लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन व व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील ४ गावा मध्ये सिमेंट नाला बंधारा, माती बंधारा दुरुस्ती व गाळ काढणे, सूक्ष्म व तुषार सिंचन व रुफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवणे असे उपक्रम राबविण्याचा शुभारंभ नुकताच आणे येथे गावाच्या सरपंच प्रियांका प्रशांत दाते यांच्या हस्ते ४४ शेतकऱ्यांना सूक्ष्म व तुषार सिंचन वाटप करून मोठ्या उत्साहात सुरु करण्यात आला.लुपिन फाउंडेशन व व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड च्या कार्यास शुभेच्छा देऊन गावातील नागरिकांना सदर विकास काम सहकार्य करून गावातील भुजल पातळी वाढविण्याचे आवाहन सरपंच यांनी केले.बलराम डेअरीचे चेअरमन ज्ञानेश्वर संभेराव यांनी गावामध्ये सिमेंट नाला बंधारा, पाझर तलावतील गाळ काढणे व उपलब्ध असलेल्या पाण्याचे सूक्ष्म व तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकासाठी लागणाऱ्या पाण्याचे काटेकोर नियोजन करून उत्पन्न वाढविण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा यावर मार्गदर्शन केले.श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मधुकर दाते यांनी शेतकऱ्यांनी सदर सूक्ष्म व तुषार सिंचनाचा प्रभावी उपयोग करावा व जास्तीत जास्त क्षेत्र ओलिता खाली आणून आपला विकास साधावा व होणाऱ्या जल संधारनाच्या विविध विकास कामात कोणताही अडथळा येणार नाही याची गावकऱ्यांनी दक्षता बाळगावी व सहकार्य करून आपल्या गावचा विकास करावा यावर आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमात फिनोलक्स कंपनीचे वरिष्ठ अभियंता संभाजी कठाळे यांनी सूक्ष्म व तुषार सिंचन बाबत ची तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना दिली व येत्या आठवड्या भरात सर्व शेतकऱ्यांच्या शेत पिकात सदर सिंचन बसवून देण्यात येणार असल्याचे ही सांगितले.सदर कार्यक्रमात लुपीन फाउंडेशन चे वर्क साईड हेड वेंकटेश शेटे,जिल्हा व्यवस्थापक संदीप झणझणे,फिनोलक्स कंपनीचे पुणे जिल्हा व्यवस्थापक राहुल चव्हाण, रोहित कदम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व या कार्यक्रमास आणे गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रशांत दाते, भास्कर आहेर, प्रदिप आहेर, पोपट दाते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.सदर कार्यक्रमाची प्रस्तावना लुपिन फाउंडेशन चे शिरूर,आंबेगाव व जुन्नर तालुका व्यवस्थापक प्रताप मोटे यांनी केले व सदर कार्यक्रम बाळासाहेब बोराडे व मछिंद्र खरात यांनी यशस्वी रित्या पार पाडला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!