मोठी बातमी! पुणे ग्रामीण जिल्ह्यात शस्त्रबंदी, जमावबंदी आदेश जारी
1 min read
पुणे दि.९:- पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था राखणेकामी अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम, यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन व The Maharashtra Police Act (Bombay Aet No.XXII OF १९५१) (Title Substituted For The Bombay Police Act, १९५२) चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन
पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये २२ जानेवारी २०२६ रोजी २४ वाजेपर्यंत खाली नमूद केलेली कृत्य करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे. दगड अथवा शस्त्रे किवा अस्खे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे.
शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढा-यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.
ज्यामुळे सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किवा अविर्भाव करणे कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे.
ज्या योगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पध्दतीने कलम ३७ (१) व (३) विरुध्द वर्तन करणे. कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे, तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणुका काढणे.
वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार वाळगणे आवश्यक आहे व त्याबबात परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII Of १९५१) (Title Substituted For The Bombay Police Act, १९५१) चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.
