सूर्या करिअर अकॅडमीत मिनी पोलीस भरती महाडेमो
1 min read
आळेफाटा दि.९:- महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेली सूर्या करिअर अकॅडमी आळेफाटा (ता.जुन्नर) येथे मिनी पोलीस भरती महाडेमो चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.१० जानेवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत मैदानी चाचणी असेल तर दुपारी १ वाजता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.या महाडेमोसाठी प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे प्रवेश फी असणार आहे. यासाठी नॅशनल कोच अंकित कुमार सिंह (झारखंड) तसेच सूर्य करिअर अकॅडमी चे संचालक श्रीकांत मदने यांच मार्गदर्शन लाभणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व मुलामुलींसाठी ही सुवर्णसंधी असून शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये महाराष्ट्रात प्रथमच या महा डेमोचे सूर्या करिअर अकॅडमी ने आयोजन केले आहे. या भरती साठी नायब तहसीलदार सचिन मुंडे,
यूपीएससी एमपीएससी मार्गदर्शक राजेंद्र भराटे यांची उपस्थिती असणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मुला मुलीस प्रत्येकी 5001, द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी 4001 व तृतीय क्रमांकासाठी 2501 एक रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
पत्ता:- सूर्या करिअर अकॅडमी, विघ्नहर सुपर शॉपीच्या पाठीमागे, आळेफाटा, तालुका – जुन्नर, जिल्हा- पुणे. संपर्क
9860709076 व 7388889003
