आणे येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना; पोलीस इन्स्पेक्टर भास्कर डोंगरे यांची अध्यक्षपदी निवड
1 min read
आणे दि.७:- श्री रंगदास स्वामी महाराज मंदिरात सरदार पटेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन माजी विद्यार्थी संघाची स्थापना केली.माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत पी.आय. भास्कर डोंगरे यांची कार्यकारिणीसह निवड करण्यात आली.एम.डी.पाटील शिंदे, रंगनाथ बेलकर, उपाध्यक्ष तर कोषाध्यक्षपदी तुषार आहेर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सदस्यपदी सर्वश्री डॉ.दिपक हांडे,अनंथा आहेर,जयराम दाते,बाबाजी शिंदे,बाबाजी दाते,किरण आहेर,पांडुरंग आहेर, लता आहेर यांची निवड करण्यात आली.या निवड कमिटीचे प्रमुख म्हणून देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी कामकाज पाहिले.संघाचे सचिव, शाळेचे मुख्याध्यापक धोंडिभाऊ शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या संघ निवडीवेळी शाळेचे माजी विद्यार्थी सर्वश्री.सुरेश पंदारे,चंद्रकांत देशमुख,बाळकृष्ण गगे,योगाचार्य किशोर आंबेकर,विजयकुमार उर्फ बाबाजी आहेर,लक्ष्मण गुंड यांनी संघ कार्यकारिणी निवडीमध्ये सल्लागार समितीचे सदस्य म्हणून ऑनलाईन सहभाग नोंदविला.तुषार आहेर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या संघाचे सभासदत्व घेण्याचे आवाहन केले.
