बंडु आहेर यांना राज्यस्तरीय युवाभुषण पुरस्कार
1 min read
पेमदरा दि.७:- पेमदरा (ता.जुन्नर) गावातील सामाजिक कार्यकर्ते, सरदार पटेल हायस्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडु उर्फ पांडुरंग दशरथ आहेर यांना महाकाल संस्थानचे श्रीमहंत डॉ.श्रीकांतदास धुमाळ,डॉ.शंकर अदानी,रुचिरा देसाई यांच्या हस्ते युवाभुषण पुरस्कार प्रदान आला.
निमित्त होते अहिल्यानगर येथे आयोजित ‘स्वराज्य’ सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय सन्मान 2025 सोहळ्याचे.हा सन्मान आहे कर्तृत्वाचा, दातृत्वाचा, समाजाशी नाळ जोडलेल्या नेतृत्वाचा असे प्रतिपादन पुरस्कार सोहळा संयोजन समितीचे प्रमुख बाबासाहेब पावसे यांनी केले.
सोमवार दि.५ जाने 2026 रोजी या दिमाखदार सोहळ्यात राज्यभरातील विविध गावांचे सरपंच,उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बंधु आदींना गौरविण्यात आले.हा सत्कार समारंभ सरपंच संघटित चळवळीचे नेते सचिव बाबासाहेब पावसे,अध्यक्ष रोहित पवार,संपर्कप्रमुख मा.अमोल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी सत्कारमुर्ती बंडु आहेर यांच्या अर्धांगिनी शोभा आहेर, माजी उपसरपंच, पेमदरा तसेच माजी सरपंच कृष्णा रामभाऊ बेलकर, तुषार आहेर, अरुण बर्डे मंचावर उपस्थित होते.आणे पठारावरील पेमदरा ग्रामस्थांच्या वतीने बंडु आहेर यांचे माजी सरपंच रंगनाथ बेलकर यांनी अभिनंदन केले तसेच परिसरातून मित्रमंडळी त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सरदार पटेल हायस्कूल,आणे चा संपूर्ण स्टाफ, मा. मुख्याध्यापक धोंडिभाऊ शिंदे व विद्यार्थ्यांनी देखील त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या संयोजक समितीतील बाबासाहेब पावसे, यादवराव पावसे यांनी नियोजन केले.
महाराष्ट्रातील तमाम सरपंचांचा ऐतिहासिक संकल्प ग्रामसभेत घेणार ‘स्त्री जन्माच्या स्वागताचा’ ठराव स्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आंतरराष्ट्रीय नोबेल पीस पुरस्कारासाठी नामांकित डॉ सुधा कांकरिया या उपस्थित होत्या.
