वहिनीचा खून करणाऱ्या दिरास २४ तासात ठोकल्या बेड्या
1 min read
जुन्नर दि.८:- भावाच्या पत्नीचा खून करून पसार झालेल्या दीरास पोलिसांनी २४ तासात अटक केली. तुषार निंबा साबळे (वय ४८ रा. निमगीरी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव असून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मिळाला आहे.
जुन्नर पोलीस स्टेशन हद्दितील मौजे निमगिरी येथील शरद निंबा साबळे यांची पत्नी अरूणा शरद साबळे हिचा दीर तुषार निंबा साबळे याने सोमवारी (दि.५) सायंकाळी ५.४५ ते ६ वाजण्याच्या सुमारास राहते घराचे समोरील अंगणात शेतीचे व घराचे जागेचे वादाचे कारणावरून चाकुने छातीमध्ये भोकसुन खुन केला होता.
त्याबाबत शरद निंबा साबळे यांनी जुन्नर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. आरोपी तुषार साबळे हा खून करून पळुन गेला होता.उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक किरण अवचर आरोपीचा शोध घेवुन अटक करण्याची सूचना दिली होती.
त्यानंतर जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे तसेच गणेश शिंदे, दादा पावडे, कैलास केंद्रे यांनी जुन्नर शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला.दरम्यान, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर रायगोंडा
व त्यांचे सोबतचे पोलीस अंमलदार यांचे मदतीने यशोदीप चौक वारजे परिसरात सापळा रचून तुषार यास पकडले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे व पो.कॉ. गणेश शिंदे हे करीत आहेत.
