जुन्नर तालुक्यातील आंबे मोहरांनी बहरली; यंदा उत्पादन चांगले येण्याची आशा

1 min read

जुन्नर दि.५ :- जुन्नर तालुक्यात हिरव्या गर्द रंगाच्या आंब्याच्या झाडावर पिवळा, सोनेरी मोहोराने निसर्ग सजलेला दिसून येत आहे. या मोहोरचा मंद सुगंध परिसरात दरवळीत आहे. तालुक्यात भरपूर रायवळ आंब्याची मोठमोठी झाडे आहेत. डोंगरात, रस्त्याच्या कडेने, शेतात व बांधावर आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यावर्षी आंब्याच्या झाडांना मोहोर चांगला आल्याने मोहोर नी बहरलेली आंब्याची झाडे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच केसर, जुन्नर हापूस, पायरीची मोठ्या क्षेत्रात लागवड झाल्याने आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तालुक्यातील रायवळ आंब्यास मोठ्या प्रमाणात मागणी असते. वेगवेगळ्या चवीचे व आकाराचे रायवळ आंब्याचे प्रकार येथे आढळतात.मे महिन्याच्या अखेर व जून महिन्यामध्ये शेतकरी या आंब्याच्या घेऊन शेतकरी गावाच्या रस्त्यावर, बाजारपेठेत विक्रीस बसलेले दिसतात. तालुक्यात येणारे पर्यटक आवर्जून आंबे स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी करीत असताना दिसतात. यावर्षी आंब्याच्या विक्रीतून काही उत्पन्न मिळेल यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.

[जुन्नर तालुक्यात दोन- तीन दिवसांपासून ढगाळ वातावण आहे. या वातावरणाचा मोहरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.]

———

“यावर्षी आंब्यांना चांगला मोहर आला आहे. आमची ६५ ते ७० केशर आंब्याची बाग आहे. गेल्या वर्षी पेक्षा चांगला बहर आला आहे. परंतु ढगाळ वातावरण जास्त दिवस राहिले तर गळ होण्याची शक्यता आहे. निसर्गचक्रातून सुटका झालेल्यास आंब्याचे उत्पादन चांगले होईल. “

नारायण सावंत,
आंबा उत्पादक शेतकरी, बांगरवाडी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!