नगदवाडी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

1 min read

नगदवाडी दि.५:- नगदवाडी ता.जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.अशी माहिती केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला बोऱ्हाडे यांनी दिली.कार्यक्रमाच्या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थीनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंची वेशभूषा परिधान करून त्यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थिनी मैत्री कुतळ, जोया अन्सारी, अन्वी बढे, तेजस्विनी बढे, मिनाक्षी चव्हाण, प्रणवी शिंदे,महेश्वरी बढे, रंजना चव्हाण, सायली शिंदे, सार्विका कोकणे, ऋत्विका बढे, सानवी बढे, सानवी चव्हाण, भूमी बढे, आरोही त्रिभुवन, आराध्या बढे, स्वरा बढे, आराध्या राठोड, तेजवी कोरडे, मैत्री टेके, परी टेके, हार्दिक जोगराणा व मेहुल जोगराणा या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवनीत इंग्रजी पॉकेट डिक्शनरी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन केंद्रशाळेतील शिक्षक मंगेश मेहेर, पंडित चौगुले, निलेश शेलार, विद्या वाघ, सुप्रिया अभंग, आशा आरेकर व उज्वला कांबळे यांनी केले.बालिका दिनानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!