समाजातील सर्व घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्या- जिल्हाधिकारी

1 min read

पुणे दि.३१:- जिल्ह्यात आरोग्य संस्थांनी समाजातील सर्व घटकांना दर्जेदार व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासोबतच विविध आजाराविषयी जनजागृती कार्यक्रम राबवाबेत, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समन्वय समिती बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सूचना दिल्या.यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात आला तसेच विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे, निवासी वैद्यकीय डॉ. वंदना जोशी, यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, विविध समित्यांचे सदस्य तसेच संबंधित इतर विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीत माता व बाल आरोग्य, संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, लसीकरण, सार्वजनिक आरोग्य सुविधा तसेच आरोग्य विभागाच्या कामकाजातील प्रगती व अडचणी यावर विचारविनिमय करण्यात आला.नागरिकांना दर्जेदार व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.डुडी म्हणाले, ग्रामीण व शहरी भागात नागरिकांना बोगस डॉक्टराविषयी वस्तुस्थितीदर्शक माहिती देण्याकरिता ग्रामसभा, नगरपरिषद बैठकीत माहिती द्यावी. नागरिकांना गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध कायदा), १९९४ अंतर्गत जिल्हा दक्षता समिती कार्यरत आहे. लिंग निदानाबाबत https://amchimulgimaha.in/ या संकेतस्थळावर तसेच 18002334475 आणि १०४ या टोलफ्री क्रमांकवर तक्रार कराण्याबाबत माहिती द्यावी. सोनोग्राफी केंद्रांची काटेकोर तपासणी करून कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत शासकीय व सूचीबद्ध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा-कॅशलेस व पेपरलेस उपचार पद्धतपात्र लाभार्थ्यांची यादी अद्ययावत करावी. आयुष्मान कार्ड तयार करुन ग्रामीण व दुर्गम भागात कार्ड वितरणावर अधिकाधिक भर द्यावा. शासकीय व खासगी रुग्णालयांचे सूचीकरण रुग्णालयांनी योजनेनुसार योग्य उपचार व सेवा देणे. आयुष्यमान कार्डबाबत शिबीराचे आयोजन करावे, आशा व अंगणवाडी सेविकांचा सहभाग घेत पात्र कुटुंबाची माहिती गोळा करावी. जन्म किंवा मृत्यूची घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत संबंधित कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी करण्यास उशीर झाल्यास, शासनाने विहित केलेल्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच जन्म, मृत्यू नोंदणी करण्यात येईल. निबंधकांनी आपल्या कार्यक्षेत्रात घडलेल्या घटनांचीच नोंदणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. अनावश्यक अडचणी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी वेळेत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचवावी. याकरिता शाळा व महाविद्यालयां मध्ये व्याख्याने व शपथ कार्यक्रम, ग्रामसभा, नागरी वस्ती बैठका, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आरोग्य मेळावे, पथनाट्य, रॅली, पोस्टर व बॅनरद्वारे जनजागृती, जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, आशा, एनएनएम,अंगणवाडी सेविकांमार्फत घरभेटीद्वारे जनजागृती, 1800112356 टोल फ्री क्रमांकाबाबत माहिती, आरोग्य, शिक्षण, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, नगरपरिषद यांच्यात समन्वय, तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होणे,तरुण व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढणे, तंबाखूमुक्त जिल्ह्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल नियमित लसीकरण व कुटुंब नियोजन करावे.

राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत “एकही बालक वंचित राहू नये” याकरिता गर्भवती माता व ०-५ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण, क्षयरोग, पोलिओ, गोवर, धनुर्वात, डांग्या खोकला, हिपॅटायटिस-बी इ. आजारांपासून संरक्षणाकरिता वेळेत पूर्ण लसीकरण करावे.कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढविण्याकरिता, महिला आरोग्यावरील भार कमी करणे, कुटुंबाचे आरोग्य व आर्थिक स्थैर्य तसेच समुपदेशनाकरिता पुरुषांमधील भीती, गैरसमज व सामाजिक अडथळे दूर करणे,पुरुष गट सभा, कामगार व शेतकरी मेळावे, ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था व धार्मिक, सामाजिक नेत्यांचा सहभाग, यशस्वी पुरुष नसबंदी केलेल्या लाभार्थ्यांचे अनुभव कथन, अपेक्षित निष्कर्षपूर्ण व वेळेत लसीकरणाचे प्रमाणात वाढ, कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढणेमाता व बालमृत्यू दरात घटआरोग्यदायी व संतुलित कुटुंब संकल्पनेला चालना सांस (श्वसन आजार) जनजागृती करणे.सांस ही तातडीची वैद्यकीय समस्या असू शकते, याबाबत लोकांमध्ये जाणीव निर्माण करणे, वेळेवर उपचार न घेतल्यास होणारे धोके समजावून सांगणे, घरगुती उपायांवर अवलंबून न राहता आरोग्य संस्थेत उपचार घेण्यास प्रवृत्त करणे. मानसिक आजाराबाबतचे गैरसमज दूर करणे, मानसिक आजार हा उपचारयोग्य आहे हे पटवून देणे, रुग्ण व कुटुंबीयांना उपचारासाठी पुढे येण्यास प्रवृत्त करणे.कुष्ठरोगाबाबतचे आजाराची लवकर ओळख व वेळेवर उपचार सुनिश्चित करणे, दिव्यांगत्व रोखणे व रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन जनजागृतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, कुष्ठरोग दिनानिमित्त विशेष जनजागृती उपक्रम, रुग्ण व कुटुंबासाठी मार्गदर्शन, लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी, औषधोपचार पूर्ण कालावधीपर्यंत नियमित घेणे, जखमांची काळजी व स्वच्छता समाजाकडून भेदभाव न करता सहकार्य करणे, उपचार व पुनर्वसन सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात उपचार, जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत औषधे, दिव्यांगत्व असलेल्या रुग्णांसाठी पुनर्वसन व सहाय्य योजना,संशयित रुग्ण शोध मोहीम प्रभावी करणे,कुष्ठरोगाची लवकर ओळख व उपचार, अपंगत्वाचे प्रमाण कमी होणे, समाजातील भीती व भेदभाव कमी होणे, कुष्ठरोगमुक्त जिल्ह्याकडे वाटचाल करावी.क्षयरोगाबाबतचे गैरसमज व भीती दूर करणे, लक्षणे ओळखून वेळेवर तपासणी व उपचार घेण्यास प्रवृत्त करणे, उपचार सतत न सोडता पूर्ण करण्याचे महत्त्व पटवून देणे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, टीबी रुग्णांसाठी शासकीय योजनानिक्षय पोषण योजनाअंतर्गत दरमहा आर्थिक सहाय्य,उपचारादरम्यान पोषण व समुपदेशन सेवानिक्षय मित्र उपक्रमाद्वारे सामाजिक सहकार्य, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, पंचायत, कामगार विभाग यांच्यात समन्वय, संशयित रुग्ण शोध मोहीम, औषधोपचार पूर्णतेचा औषधोपचार अपूर्णतेचे प्रमाण कमी होणे, संसर्ग साखळी तोडणे, क्षयरोगमुक्त जिल्ह्याकडे वाटचाल आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.याकरिता जनजागृतीकरिता शाळा, महाविद्यालयांमध्ये आरोग्य शिक्षण, पोस्टर, बॅनर, पत्रके, पथनाट्य, रॅली, ग्रामसभा, शहरी वस्ती बैठका, महिला व युवक मेळावे, आशा व एएनएम, अंगणवाडी सेविकायांच्यामार्फत घरभेटीद्वारे समुपदेशन, आरोग्य शिबीरे, शाळा, महाविद्यालये, महिला बचत गटांद्वारे जनजागृती, स्थानिक केबल, रेडिओ, सोशल मीडियाचा वापर करावा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!