रोटरी क्लब ऑफ आळेफाटा च्या वतीने रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालयाला पाच लक्ष पाण्याची टाकी
1 min read
आळेफाटा दि.१९:- रोटरी क्लब ऑफ आळेफाटा यांच्या वतीने वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालयात पाच लक्ष खर्च करुन पाण्याची टाकी बांधली असुन व तीन केवी जनरेटर बसविण्यात आले असुन यांचे उद्घाटन आळेफाटा रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष ज्ञानेश जाधव, प्रांतपाल डॉ. अनिल परमार , प्रांतपाल शितल शहा, रोटरी क्लब ऑफ निगडी चे प्रेसिडेंट प्रणिता संजीव अलुरकर, पास्ट प्रेसिडेंट विजय काळभोर, सेक्रेटरी केशव मानगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी पाहुण्यांचे स्वागत ढोल ताशा व लेझीमच्या गजरात करण्यात आले. यापूर्वी रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयास ५० बेंचेस प्रदान करण्यात आले होते. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलचे उपाध्यक्ष विजयकुमार आहेर, सचिव संभाजी हाडवळे , प्रोजेक्ट इन्चार्ज विमलेश गांधी, संस्थापक महावीर पोखरणा, असिस्टंट गव्हर्नर संजय टेंभे,पंकज चंगेडिया, हेमंत वाव्हळ, सागर लामखडे, सौरभ बोरा, वेदप्रकाश कणसे, विजय कणसे , शंकर गडगे, मधुकर बोडके, चिराग जगदाळे, राहुल शेलार इत्यादी रोटरीयन्स उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष उल्हास देवकर आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी रोटरी प्रांतपाल डॉ. परमार यांनी आपल्या भाषणात म्हणाले की रोटरी क्लब ऑफ ऑफ आळेफाटा सेंट्रलचे अध्यक्ष ज्ञानेश जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात एक कोटी रुपयां पेक्षा जास्त कामे केली असून खूपच उत्कृष्ट कार्य केलेले आहे. यापुढील काळातही रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल अशाच प्रकारचे उत्कृष्ट कार्य करील आणि समाजात आपला वेगळा ठसा उमटवेल.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावळे यांनी केले तर आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुऱ्हाडे यांनी मानले.