नारायणगावात पार पडला भजन महोत्सव
1 min read
नारायणगाव दि.१६:- श्री भक्त पुंडलिक मंदिराचा जिर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने भजन महोत्सव नारायणगाव (ता.जुन्नर) मध्ये पार पडला. काही महिन्यापूर्वी नारायणगाव मधील सामाजिक कार्यकर्ते बारकुनाना डेरे यांच्या स्मरणार्थ श्री भक्त पुंडलिक मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा अर्थसंपदा पतसंस्था परिवाराच्या वतीने संस्थापक अध्यक्ष रमेश महादेव मेहेत्रे यांच्या संकल्पनेतून काम करण्याचे ठरविले.
त्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर एकादशीच्या मुहूर्तावर भजन महोत्सव नारायणगाव मध्ये भरवला व तो पार पडला. भजने महोत्सवामध्ये हरी स्वामी महिला भजनी मंडळ मुक्ताई सांप्रदायिक भजनी मंडळ श्री संत सावता महाराज भजनी मंडळ चिमणवाडी यांनी सहभाग घेतला.
सामाजिक कामात अग्रेसर असणारी अर्थसंपदा पतसंस्था या पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी सल्लागारांनी एकत्र येऊन एवढा मोठ काम उभं केलं निश्चित हे काम कौतुकास्पद आहे असे अमित बेनके म्हणाले. भक्त पुंडलिकाचे मंदिर हे फक्त ज्या ठिकाणी संजीवन समाधी आहे.
त्यामध्ये संत ज्ञानोबाचे आळंदी ,संत तुकोबारायांचे देहू आणि संत हरी स्वामींचे नारायणगाव आणि विठुरायाचे पंढरपूर या ठिकाणीच भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे आणि ही नारायणगावकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असे आशिष माळवदकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या वेळी युवा नेते अमित बेनके, आशिष माळवदकर, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, किरण बनकर, बजरंग कोराळे, सागर दरंदळे, रत्नाकर सुबध, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन विलास पानसरे अनंत भोर, उत्तम मेहेत्रे , हिराबाई शेटे, सुरेखा बेनके, कविता मंचरे, शरद शिंदे,निलेश कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार भोंडवे यांनी केले ,आभार आशिष माळवदकर यांनी केले.