कथे फाउंडेशनच्या वतीने ‘मिशन आयएएस’

नारायणगाव दि.१५ : डॉ. पंजाबराव कथे फाउंडेशन व डॉ. कथे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट यांच्या वतीने नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालयात ‘मिशन आयएएस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

यावेळी प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे हे विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेची तयारी या बाबत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती डॉ. पंजाबराव कथे यांनी दिली. डॉ. कथे म्हणाले, “योग्य मार्गदर्शनाअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असून देखील स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकत नाहीत.

ही उणीव भरून काढण्यासाठी व विद्यार्थ्यांचे आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता कथे फाउंडेशन व डॉ. कथे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट यांच्या वतीने ‘मिशन आयएएस’ या कार्यक्रमाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी ८७९३४६७००३ या क्रमांकावर मेसेज अथवा संपर्क साधावा.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे