बेल्हे ग्रामपंचायत तर्फे महिलांना मोफत प्रशिक्षण

1 min read

बेल्हे दि.११:-बेल्हे ग्रामपंचायत तर्फे महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले.त्यामधे शिवण क्लास, ब्युटी पार्लर ,मसाले, केक या सर्व गोष्टीचे प्रशिक्षण रुपश्री महिला विकास संस्थे कडून मिळाले. महिलांसाठी हे प्रशिक्षण खर्या अर्थाने महिला सक्षमीकरण ठरले. महिलांना कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारचे केक , मसाले, शिवण कामाचे कपडे शिऊन त्याचे कार्यक्रमात प्रदर्शन देखील मांडले.

खूप मोठ्या प्रमाणात महिलांना सहभाग दाखवला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच गोरक्षनाथ वाघ हे होते, तसेच सदस्य रंजना पिंगट ,निकिता शिंदे, शीतल पळसकर, लीला बोरचटे ,कैलाश अरोटे, मान्यवरांनी उपस्थिती दाखवली. तसेच तथास्तू ग्रामसंघ कोषाध्यक्ष सायली वाघ, रूपश्री महिला विकास संस्थेच्या अध्यक्ष अश्विनी नवले या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी प्रशस्तिपत्रक देण्यात आले.सर्व ग्रामस्थ, सदस्य ,तथास्तू ग्रामसंघ,कर्मचारी वर्ग ,ग्रामसेवक सर्व उपस्थित. मान्यवरांचे आभार गोरक्ष नवले यांनी मानले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे