आनंदाची बातमी! राज्यात मान्सून दाखल

1 min read

पूणे दि.११: सर्वांसाठी आनंदाची बातमी असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मोसमी पाऊस अखेर आज रविवार दि.११ रोजी दुपारी राज्यात दाखल झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरीत मोसमी पाऊस दाखल झाला असून, हलक्या आनंद सरीही सुरू झाल्या आहेत.

राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस सात जून रोजी दाखल होतो. पण, यंदा केरळमध्ये मोसमी पाऊस उशिराने म्हणजे बुधवारी सात जून रोजी दाखल झाला होता. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार रविवारी मोसमी वाऱ्यांनी रत्नागिरीत हजेरी लावली आहे. राज्यात मोसमी वारे दाखल होत असतानाच कर्नाटकात शिमोगा, हसनपर्यंत मोसमी वाऱ्यांनी मुसंडी मारली आहे. पश्चिम बंगालमध्येही मोसमी वारे दाखल झाले आहे.
पूणे वेधशाळेच्या हवामान विभागाचे अंदाज प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी रविवारी सकाळी समाजमाध्यमावर कोकण किनारपट्टीवर मोठ्या संख्येने ढग जमा होत असल्याची माहिती दिली होती.

त्यानंतर हवामान विभागाकडून अधिकृत घोषणेची प्रतिक्षा होती.केरळमध्ये बुधवारी, ७ मे रोजी दाखल झालेला मोसमी पाऊस केवळ चार दिवसांत राज्यात दाखल झाला आहे. साधारणपणे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर सात-आठ दिवसांनी मोसमी पाऊस राज्यात दाखल होतो. यंदा केरळमध्ये दाखल झाल्यानंतर केवळ चारच दिवसांत मोसमी वारे राज्यात दाखल झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे