श्री रेडा संजीवन समाधी मंदिर ते पंढरपुर आषाढी पायीवारी पालखी सोहळयाचे उद्या प्रस्थान
1 min readआळे दि.१०:- श्री संत ज्ञानेश्वर महाराजांणी वेद बोलाविलेल्या श्री रेडा संजीवन समाधी मंदिर ते पंढरपुर आषाढी पायीवारी पालखी सोहळयाचे प्रस्थान उद्या रविवार (दि.११) रोजी होणार असुन यावर्षी रथ ओढण्याचा मान आळे (ता.जुन्नर) येथील बबन धोंडीभाऊ जठार या कुटुंबाच्या बैलांणा मिळाला आहे. अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय काळे,उपाध्यक्ष संजय शिंदे व व्यवस्थापक कान्हु पाटील कु-हाडे यांणी दिली.
नुकतेच रथ ओढणा-या बैलांची विधीवत पुजा पालखी सोहळा अध्यक्ष व म्हतू सहाणे, देवस्थान ट्रस्ट चे सेक्रेटरी अविनाश कुऱ्हाडे, माजी अध्यक्ष व विश्वस्त गिरीष कोकणे, पोपट वाघोले, सखाराम कुऱ्हाडे ,म्हातारबा पिंगळे, किसन पाडेकर, विठ्ठल पिंगळे, अमोल जठार, चारूदत्त साबळे, संतोष पाडेकर, विलास शिरतर, संजय खंडागळे, बाळासाहेब शेळके, ॲड.सुदर्शन भुजबळ, बाळाराम डावखर, गोरक्षनाथ दिघे, ज्ञानदेव सहाने, बाजीराव निमसे, महेंद्र गुंजाळ, प्रसन्न डोके, महेंद्र पाडेकर, माधव टकले आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान हा दिंडी सोहळा आळे, बेल्हा, पारगाव (मंगरूळ), हाजीटाकळी, रामलिंग, निमोणे, इनामगाव, दौंड, काळेवाडी, भागवत स्टेशन, पळसदेव, वनगळी, संस्थान रांजणी देवाची, टेंभुर्णी, करकंब व दि.२७ रोजी पंढरपुर या ठिकाणी पोचणार आहे.