बोरीची श्रुतिशा पटाडे झाली IAS ऑफिसर; यूपीएससी परीक्षेत २८१ व्या क्रमांकावर

1 min read

आळेफाटा ता.२४ :- बोरी बुद्रक (ता.जुन्नर) येथील अतिशय सर्व साधारण कुटूंबातील सुभाष पटाडे यांची कन्या श्रुतिशा पटाडे हीची यूपीएससी परीक्षेत २८१ व्या क्रमांकावर असुन त्यांची IAS पदी निवड झाली आहे.श्रुतिशाने व्हिजेटीआयटी मधुन बी.टेक. मेकॅनिकल ही पदवी घेतली आहे.सन २०१९ मध्येच त्यांची एम.पी.एस.सी. च्या मार्फत उपजिहाधिकारी पद मिळाले होते परंतु त्याचवेळी यूपीएससी च्या परीक्षेत IP & TAFS हे पद मिळाले व ते स्विकारले.

या पदासाठी प्रशिक्षण आणि सेवा सुरू असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास केला व आपल्या गुणवत्तेच्या आधारावर IAS होण्याचे स्वप्न साकारले. पटाडे यांची सनदी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल तिचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे,आशा बुचके यांनी अभिनंदन केले.

“मला मोठे करण्यात माझे आई वडील तसेच शाळेतील शिक्षक तसेच आमच्या बोरी गावातील सर्व ग्रामस्थांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करत प्रेरणा दिल्याने मी या पदापर्यंत येऊन पोचले आहे.मी त्यांचे कायम रूणी राहील.”

श्रुतिशा पटाडे, बोरी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे