पानटपरी चालकाच्या मुलीची मुंबई पोलीस दलात निवड
1 min read
बेल्हे दि २२:- राजुरी (ता. जुन्नर) येथील सुरेश कारभारी हाडवळे यांची परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या पानटपरी चालकाच्या मृणाल हाडवळे या मुलीची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने तिने तिच्या आई वडिलांचे स्वप्न पुर्ण केले आहे.
सुरेश हाडवळे हे आपली घरची असलेली थोडीफार शेती करून तसेच गावात पानटपरी चालवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना त्यांचे स्वप्न होते की आपल्या मुलीने पोलीस दलात दाखल होऊन देश सेवा करावी आज त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता.
पहिल्यापासूनच शालेय जीवनातून अभ्यासाची गोडी असताना मनात जिद्द होती की आपण काहीतरी करू शकतो यासाठी त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा परीषद प्राथमिक शाळा व विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गावातच झाले आहे व पुढील शिक्षण पुणे या ठिकाणी घेऊन बी.एस.सी पुर्ण केल्यानंतर आळेफाटा येथील एका करीअर ॲकडमीत
प्रशिक्षण घेत विविध परीक्षांचा अभ्यास पूर्ण करत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होऊन एक आदर्श समाजापुढे दाखवून दिला आहे.
तिला या साठी उत्तम गोरडे,आशिष सुपेकर,आदेश हाडवळे यांणी मार्गदर्शन केले.आई-वडिलांच्या अथक परिश्रम व कष्टाला सार्थ होत तीने हे यश मिळवले आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व परिसरातून राजुरी येथील ग्रामस्थांकडून तसेच विविध माध्यमातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
“आपल्या मुलीने पोलीस व्हावे ही माझ्या आई वडिलांची इच्छा होती. आमची घरची परिस्थिती अतिशय गरीब असुन सुध्दा काबाडकष्ट करुन शिकवले.तसेच मला ॲकडमी मधील शिक्षकांणी मार्गदर्शन केल्याने व पोलीस व्हायचेच हि जिद्द ठेवल्याने आज माझे स्वप्न पुर्ण झाले आहे.”
मृणाल हाडवळे
मुंबई पोलीस