ज्ञानमंदिर हायस्कूल मध्ये ” प्रज्ञा योगा – इंटूशन प्रोग्राम ” चे आयोजन

1 min read

आळेफाटा दि.16:- ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे, संतवाडी कोळवाडी संचलित ज्ञानमंदिर हायस्कूल आळे (ता. जुन्नर) मध्ये आर्ट ऑफ लिविंग जुन्नर आंबेगाव च्या वतीने नुकताच “प्रज्ञा योगा – इन ट्युशन प्रोग्राम ” चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये पाच ते अठरा वयोगटातील संपूर्ण जुन्नर तालुक्यातील 35 विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्रशिक्षक म्हणून आर्ट ऑफ लिविंग चे सीनियर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक लक्ष्मण भंडारी होते.या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना योग ,प्राणायाम आणि मेडिटेशन द्वारे काही प्रात्यक्षिके, गेम चे प्रशिक्षण देण्यात आले. या कोर्स मुळे विद्यार्थ्यांची डोळे बंद ठेवून ओळखण्याची क्षमता जागृत होऊन त्यांच्यामध्ये एकाग्रतेमध्ये त्वरित वाढ होते.

अभ्यासामध्ये समजून घेण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते. स्वतःसाठी चांगला निर्णय घेण्याची क्षमता वाढते, तसेच विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, ग्रहण शक्ती व आकलन शक्ती मध्ये लक्षणे वाढ होते असे प्रशिक्षक लक्ष्मण भंडारे यांनी सांगितले.

कोर्स पूर्ण केलेल्या सहभागी विद्यार्थ्यांनी डोळे बंद करून चित्र काढणे, वाचन करणे ,रंग ओळखणे आदी प्रात्यक्षिके उपस्थित पालकांसमोर प्रत्यक्ष करून दाखवल्याने पालक वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय नाना कुऱ्हाडे, माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक किशोर कुऱ्हाडे ,सचिव अर्जुन पाडेकर, उपाध्यक्ष सौरभ डोके व संस्थेचे खजिनदार अरुण हुलावळे , प्राचार्य डॉ प्रवीण जाधव यांचे शुभ हस्ते झाले. कार्यक्रमास संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने शुभेच्छा भेटी दिल्या.

या कार्यक्रमाचे नियोजन आर्ट ऑफ लिव्हिंग चे योग प्रशिक्षक प्रा. डॉ.अरुण गुळवे, अण्णासाहेब वाकचौरे,सुवर्णा मुळे, शेटे सर, राजश्री कवडे, प्रतिभा शेरकर ,ढमाले सर, बाम्हणे सर , डॉ.तुषार झोपे, अडागळे सर आदींनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे