धनगर समाजातील मुलांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत शिकण्याची सुवर्ण संधी

1 min read

आळेफाटा दि.१८:- श्री जे आर गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आळेफाटा (तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) येथे धनगर समाजाच्या (NT-C ) प्रव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ‘शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये शिक्षण देणे’ या योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ४.९.२०१९ रोजी जी.आर. काढलेला आहे.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना इ.१ ली व२ री मध्ये प्रवेश दिले जाणार आहे. या योजने मधील पात्र विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सोयी सुविधा शाळेमार्फत मोफत पुरविल्या जाणार आहेत. तरी जे विद्यार्थी 6 ते 8.5 या वयात बसत असतील तर त्यांनी शाळेबरोबर प्रवेशासाठी संपर्क करावा.असे आवाहन शाळेकडून करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

 १.विद्यार्थी आधार कार्ड झेरॉक्स .२.जातीचा दाखला. ३. रहिवासी दाखला.४. रेशन कार्ड झेरॉक्स ५. दोन पासपोर्ट फोटो ६.जन्मतारखेचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला.7.उत्पन्नाचा दाखला एक लाखाच्या आतील (तहसीलदार) तरी इच्छुक पालकांनी शाळेत संपर्क करावा.
पत्ता:- नाशिक रोड, आळेफाटा,तालुका जुन्नर,जिल्हा:पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 02132299097- स्कूल ऑफिस 7875849295- श्री.म्हस्के सर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे