मॉडर्नचा १२ वी चा निकाल १०० टक्के; सानिका गाडगे ने पटकवला प्रथम क्रमांक

1 min read

बेल्हे दि.१२ (वार्ताहर):- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बेल्हे (ता.जुन्नर) चा इयत्ता बारावीचा सीबीएसई बोर्ड चा शैक्षणीक वर्ष २०२२-२३ चा १०० टक्के निकाल लागला आल्याची माहिती प्राचार्या विद्या गाडगे यांनी दिली. बारावीच्या एकूण १७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

त्यापैकी प्रथम क्रमांक सानिका अजित गाडगे (९३ टक्के), द्वितीय क्रमांक वैष्णवी संदीप जाधव (९१ टक्के) तर तृतीय क्रमांक लकी सुकुमार बिश्वास (९०.८० टक्के) हिने पटकवला.

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे,सर्व संचालक मंडळ, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के. पी.सिंग, वर्ग शिक्षक अमित जाधव तसेच शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे