वळसे पाटील महाविद्यालयाच्या प्रियांका औटीचा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक

1 min read

निमगाव सावा दि.८:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगावा सावा (ता.जुन्नर) प्रियांका औटी हिचा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.छाया जाधव यांनी सांगितले.

नुकतेच इंडियन रेड क्रॉस योजनेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील कुमारी औटी प्रियंका हिने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. या विद्यार्थिनीचा सन्मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते वाडिया महाविद्यालय पुणे येथील आयोजित समारंभात करण्यात आला.

याचबरोबर पोस्टर आणि निबंध स्पर्धेत अनुक्रमे मते ऋतुजा, ढोमे धनश्री, तांबे निकिता, पठाण समरीन या विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवली. या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार यांनी केले. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्याबरोबर महाविद्यालयाचाही नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले.

तसेच संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे सर्व संचालक, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.छाया जाधव आणि सर्व गुरुजनांनी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी प्रा. मोनिका जाधव आणि प्रा. प्रियंका डुकरे या शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे