ज्ञानमंदिरात उन्हाळी शिबिरात मातृ-पितृ पूजन
1 min read
आळे दि.४ : आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात उन्हाळी शिबीरानिमित्त मातृ-पित्रु पूजन केले.
या शिबीरास संस्थेचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे, भाऊ दादा कुऱ्हाडे, संचालक किशोर कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हास सहाणे, बाबू कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, कैलास शेळके, प्रदिप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुन्हाडे, शांताराम कुऱ्हाडे आदींनी भेटी दिल्या.
२० दिवस चाललेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने आरोग्य, मुल्य शिक्षण, मनोरंजन यांचे शिक्षण दिले. तसेच झुंबा, कागद काम, जादुचे प्रयोग, मातीकाम चित्र रेखाटन, रंगकाम, घोडेस्वारी, नृत्य, शास्त्रीय गायन वादन, योगा, वनभोजन, फनी गेम्स, लेझीम, शिवकालीन युद्ध कला, रांगोळी यांसारखे विविध कलांचे प्रशिक्षण दिले.
तर दैनंदिन व्यवहार, पर्यावरण, सुरक्षा, अंधश्रद्धा निर्मुलन, सामान्य ज्ञान, चित्रकला व विज्ञान व मानवी जीवन, राष्ट्रभक्ती यांसारख्या मूल्यांच्या वाढीसाठी शिबिरात विशेष प्रयत्न केले. तसेच गावचे सरपंच व जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक प्रीतम काळे यांनी आर्थिक मदत केली व उद्योजक सिध्दार्थ भुजबळ यांच्या वतीने शिबिराच्या सांगता समारंभास स्नेह भोजन देण्यात आले.
या शिबीराचे आयोजन मुख्याध्यापक संदीप भवानी, पर्यवेक्षक सुनील कोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माऊली अडागळे, मच्छिंद्र लांडगे यांनी केले. आभार जीवन शिंदे यांनी मानले.