आळेफाटा चौकात नाशिक औद्योगिक महामार्ग कायमस्वरूपी रद्दसाठी रस्ता रोको

1 min read

आळेफाटा दि.२७:- पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी सोमवार दिनांक ७ एप्रिल २०२५ पुणे – नाशिक व अहिल्या नगर- कल्याण या दोन महामार्ग जोडलेल्या आळेफाटा येथील मुख्य चौकात महामार्गातील बाधित शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन करून. आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी यांनी राजुरी येथे दिली.पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग क्रमांक ११ चे आखणी ही बागायती व सुपीक जमीन क्षेत्रातून केले असल्याने तो रद्द करावा. सदर महामार्ग झाल्यास शेतकरी उध्वस्त होणार आहे. म्हणून आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने आज पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गातील जुन्नर, आंबेगाव , शिरूर, संगमनेर या तालुक्यातील शेतकऱ्यांची आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक राजुरी (ता.जुन्नर) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेण्यात आली त्या प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेळके,वल्लभ शेळके,एम.डी. घंगाळे, दत्तात्रेय हाडवळे, मोहन नायकवडी, जि.के.औटी, सुरेश बोरचटे,कान्हु करंडे, मधुकर कारंडे, जयसिंग थोरात , गोविंद हाडवळे,प्रतिक जावळे,दिलिप जाधव,संतोष काळे, रवी हाडवळे, सुदाम औटी,अनिकेत खंडागळे, बाळासाहेब धुमाळ,भिमराव नांगरे,देवराम घुगे आदी मान्यवर तसेच दोनशेहुन अधिक शेतकरी उपस्थित होते.यावेळी औटी म्हणाले की पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा अशी भूमिका बाधित शेतकरी यांनी घेतली आहे. सरकार दडपशाही करून जमिनी ताब्यात घेत आहे. दडपशाही करणार असाल तर संपूर्ण बाधित कुटुंबांना जनावरांसह जेलमध्ये टाका शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही संघर्ष करणार असल्याचे सांगितले.उपसरपंच माऊली शेळके म्हणाले की या पट्ट्यातील शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती व दूध व्यवसाय हा आहे. मात्र हा मार्ग गेल्यास त्यांचे उत्पादनाचे साधन राहणार नाही तसेच अनेक शेतकरी जमीन गेल्याने पूर्ण विस्थापित होणार आहेत यापूर्वी देखील पिंपळगाव जोगा कालवा, कुकडी डावा कालवा, नगर कल्याण महामार्ग, नियोजित नगर रेल्वे मार्ग, आदींचा देखील सर्वे सध्या सुरू आहे म्हणून या पट्ट्यातील शेतकरी पूर्ण अडचणीत येणार आहे.दरम्यान मध्यंतरी बाधित शेतकऱ्यांनी प्रकल्पास विरोध करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या होत्या. पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी नामदार दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन. सदर महामार्ग रद्द करण्यात यावा , व रद्द झाल्याचे आधी सूचना राज्य सरकारने तात्काळ काढावे अशी मागणी केली होती. यावरती दिलीप वळसे पाटील यांनी सदर अधिसूचना रद्द होण्याच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सही झाली असून. येत्या तीन ते चार दिवसात मुख्यमंत्री यांची सही होऊन रद्द झाल्याचे आधी सूचना निघेल असे आश्वासन दिले होते. तर पुढे काय झाले त्या अद्याप समजू शकले नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे