गुंजाळवाडी आर्वीत कोल्हापुरी केटी बंधाऱ्याचे ढापे चोरीला
1 min read
आर्वी दि.२७:- नारायणगाव-कुकडी पाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुका प्रतिनिधी प्रमोद खांडगे पाटील वतीने उनाळी आवर्तन मीना नदीला सोडावे तसेच गुंजाळवाडी आर्वी कोल्हापुरी केटी बंधाऱ्याचे ढापे चोरीला गेलेले आहेत ते तात्काळ उपलब्ध करून द्यावे असे पत्र दिले आहे.त्यावेळी गुंजाळवाडीच्या सरपंच दिव्या वैभव सोलाट पाटील यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुंजाळवाडी आर्वी कोल्हापुरी केटी बंधाऱ्याचे तापी चोरीला गेल्याचा गुन्ह्याचे नोंद केली आहे.त्यांच्या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांपूर्वी गुंजाळवाडी आर्वी कोल्हापुरी केटी बंधाऱ्याचे ढापे चोरीला गेलेले आहेत.
आपण प्रत्यक्ष पाहणी करून धापे चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करावा. ढापे चोरीला गेल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे भाजीपाल्याची पिके गुरांचा चारा कांदा पाण्याबाबत जळून जात आहे तसेच या परिसरामध्ये द्राक्ष फळ पिके मोठ्या प्रमाणात आहेत.
सध्या द्राक्षाची काढणी हंगाम सुरू आहे चोरीला गेल्यामुळे बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवण होत नसल्यामुळे त्या ठिकाणी द्राक्षाची तसेच शेती पिकांचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे त्यामुळे तात्काळ बंदराचे ढापे चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करावा तसे पत्र पंचायत समिती जुन्नर व जिल्हा परिषद पुणे यांना द्यावे.
गुंजाळवाडीचे सरपंच दिव्या वैभव सोलाट पाटील यांनी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिल्यामुळे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी म्हटले आहे की मौजे आर्वी गुंजाळवाडी येथील केटी बंधाराचे ढापे चोरीला गेल्या बाबत गुंजाळवाडीचे सरपंच पत्र प्राप्त झाले आहे.
तरी सदर पत्राच्या अनुषंगाने मौजे आर्वी गुंजाळवाडी येथील केटी बंधाऱ्याचे ढापे चोरीस गेल्या बाबत पुढील अधिक तपास करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत असा गुन्हा नोंद केला आहे तरी सदर केटी बंधाऱ्याचे ढापे चोरीस गेले बाबत पुढील तपास चालू आहे.यावेळी सह्याद्री शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश शिंदे, रामभाऊ शिंदे, मुकुंद डोंगरे, विक्रम सोलट पाटील, शिवदास शिंदे, राहुल शिंदे उपस्थित होते.