श्री साईकृपा पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी सावकार पिंगट तर सचिवपदी सूर्यकांत गुंजाळ यांची निवड

1 min read

बेल्हे दि.२५:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील श्री साईकृपा पतसंस्थेची उपाध्यक्ष पदाची निवडणूक सहाय्यक निबंधक कार्यालय जुन्नर बोडकेनगर येथे मंगळवार दि.२५ रोजी अध्यासी अधिकारी संतोष भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.सदर पदासाठी सावकार पिंगट यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. त्यास सुचक म्हणून बाळकृष्ण गुंजाळ तर ठकसेन शिंदे यांनी अनुमोदन दिले. तसेच राकेश डोळस यांनी दुसरे नामनिर्देशन पत्र सादर केले त्यास सूचक म्हणून संजय विश्वासराव तर अनुमोदन गणेश सोनवणे यांनी दिले.वरील नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यावर दोन्ही अर्जाची छाननी करून दोन्ही नामनिर्देशन पत्र मंजूर झाल्याचे जाहीर केले. त्यानुसार दोन्ही उमेदवारांचे मतदान घेतले असता सावकार पिंगट यांना ७ तर राकेश डोळस यांना ६ मते मिळाली.सावकार पिंगट यांना अधिक मते मिळाल्याने अध्यासी अधिकारी सावकार भानुदास पिंगट हे संचालक मंडळाच्या उर्वरित कालावधीसाठी व्हाइस चेअरमन म्हणून निवडून आल्याचे जाहीर केले.तर सचिवपदी सूर्यकांत गुंजाळ यांची निवड झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे