गणेश दूध संस्थेत दोन्ही पॅनेलला समान जागा

1 min read

राजुरी दि.२५:- राजुरी (ता. जुन्नर) येथील गणेश सहकारी दूध संस्थेच्या संचालकपदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. निकालात श्री गणेश पॅनेल व परिवर्तन पॅनेलचे समसमान संचालक निवडून आले आहेत. दोन्ही पॅनेलला समसमान जागा मिळाल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष नेमका होणार कोणाचा? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.जुन्नर तालुक्यातील गणेश सहकारी दूध उत्पादक संस्था ही सर्वांत मोठी संस्था असून, राजुरी येथील ही एक गाव एक दूध संस्था आहे. गावामध्ये सर्व दूध उत्पादक या संस्थेला दूध पुरवठा करतात. त्यामुळे देशपातळीवर या संस्थेचा गौरव झाला आहे. तसेच, अनेक पुरस्कारांनी या संस्थेला गौरविण्यात आले आहे.सन २०२५-२०३० च्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये श्री गणेश पॅनेल व परिवर्तन पॅनेल असे दोन पॅनेल विरोधात होते. एकूण १७ जागांसाठी निवडणूक पार पडली. सर्वसाधारण गटात १२ जागांसाठी २४ उमेदवार उभे होते. दोन्ही पॅनेलला समसमान जागा मिळाल्या.यामध्ये श्री गणेश पॅनेलकडून दिलीप महादू घंगाळे, बाळू यशवंत हाडवळे, विक्रम नाथाजी डुंबरे, संजय अनंता औटी, मोहन भीमाजी हाडवळे, नीलेश मारुती हाडवळे हे विजयी झाले. तर परिवर्तन पॅनेलचे साईनाथ यशवंत हाडवळे, सुभाष विठ्ठल औटी, तुकाराम भाऊराव डुंबरे, गंगाराम मंजाभाऊ औटी, सुधीर लक्ष्मण डुंबरे, ज्ञानेश्वर महादू घंगाळे हे सहाजण निवडून आले.इतर मागास प्रवर्ग या एका जागेसाठी श्री गणेश पॅनेलचे लक्ष्मण धोंडीभाऊ घंगाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महिलांसाठीच्या २ राखीव जागांसाठी ४ महिला उमेदवार उभ्या होत्या, यामध्ये परिवर्तन पॅनेलच्या ज्योती गणेश हाडवळे, तर श्री गणेश पॅनेलच्या सुवर्णा शिवाजी औटी या निवडून आल्या.भविजा / भजा / विजा / विमाप्र या प्रवर्गाच्या एका जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात परिवर्तन पॅनेलचे किसन दशरथ गुळवे हे निवडून आले आहेत. तसेच अनुसूचित जाती/अनु. जमाती ही जागा रिक्त राहिली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून सुधीर खंबायत यांनी काम पाहिले तसेच संस्थेचे सचिव निवृत्ती हाडवळे यांनी काम काम करण्यास सहाय्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे