श्री विघ्नहर साखर कारखान्याला उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर
1 min read
ओझर दि.२३:- जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा पारदर्शक कारभार आणि शेतकरी हिताचे निर्णय तसेच सभासदांच्या असलेल्या विश्वासाच्या जोरावर विघ्नहर कारखान्याने आपली पुरस्कार मिळविण्याची परंपरा कायम राखली असून गळीत हंगाम २०२३-२४ करीता नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा उच्च साखर उतारा विभागातील प्रथम क्रमांकांचा उत्कृष्ट ऊस विकास हा पुरस्कार जाहिर झाल्याची माहिती अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली. सत्यशील शेरकर म्हणले,
विघ्नहरने २०२३-२४ चे गळीत हंगामात १० लाख २३ हजार ४२५ मे. टन ऊसाचे गाळप केले असून ११ लाख ५० हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. तर ११.६३ टक्के साखर उतारा राखण्यात यश मिळविले आहे. तसेच सहवीज निर्मीती प्रकल्पातून ४ कोटी १२ लाख ६३ हजार २०० युनिट वीज निर्यात केली.
कारखान्याचा विस्तारीत a डिस्टीलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून डिस्टीलरी प्रकल्पातून ९५ लाख १७ हजार ८३९ लिटर अल्कोहोलची व ७० लाख ७९ हजार ७५८ लिटर इथेनॉल निर्माती झाली आहे.