राजुरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांमार्फत १२५९ कुटुंबांना ई-रेशनकार्ड चे वाटप
1 min read
राजुरी दि.२२:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना, समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, समर्थ लॉ कॉलेज, समर्थ इन्स्टिट्यूट फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव “युथ फॉर माय भारत” व “युथ फॉर डिजिटल लिटरसी” या उपक्रमांतर्गत राजुरी गावातील १२५९ कुटुंबाना ई-रेशन कार्ड काढून देण्यासाठी पुढाकार घेतला. गावातील प्रत्येक मळा, शिवार, वाड्या-वस्त्यावर जाऊन विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करण्यात आले. त्या मार्फत सर्व कुटुंबांपर्यंत ई-रेशन कार्ड म्हणजे काय व त्याचे भविष्यातील फायदे याबाबत जनजागृती करण्यात आली.
हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या २७५ विद्यार्थ्यांनी राजुरी ग्रामपंचायतच्या सहाय्याने ई-रेशनकार्ड कॅम्प चे आयोजन केले. या कॅम्पमध्ये तब्बल १२५९ कुटुंबांना ई-रेशन कार्ड चे वाटप करण्यात आले.
समाजातील गरीब आणि गरजू लोकांना धान्य देण्यासाठी शासनाने शिधापत्रिका तयार केलेली आहे. हे धान्य मिळवण्यासाठी शिधापत्रिकांना १२ अंकी क्रमांक देण्यात आलेला आहे. ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका आहे त्यांना ई-शिधापत्रिका म्हणजेच डिजिटल रेशन कार्ड करून घेण्याची सुविधा राजुरी गावामध्ये उपलब्ध करून.
ती सक्षमपणे राबविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आलेले आहे. आजकाल आपल्याला माहिती असलेली सर्व कागदपत्रे डिजिटल होत आहेत. त्याचे अनेक फायदे आहेत.
हे लक्षात घेऊन भारत सरकारने नुकतेच शिधापत्रिका ही डिजिटल करण्याचा निर्णय घेतलेला आहे ही डिजिटल शिधापत्रिका डाउनलोड करण्यासाठी अन्न मंत्रालयाने ऑनलाईन पोर्टल जारी केलेले आहे.
काय आहे डिजिटल रेशन कार्ड :-
डिजिटल रेशन कार्ड हे आपल्या सामान्य रेशन कार्ड प्रमाणेच असते. ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ म्हणून सेव करू शकता किंवा त्याची प्रिंट काढून घेऊ शकता. भारत सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत रेशन कार्ड जारी केले जाते. मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन मेरा राशन नावाचे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड तसेच मोबाईल नंबर आपल्या रेशन कार्ड बरोबर लिंक केले जाते.
काय आहे डिजिटल रेशन कार्ड चे फायदे:-
आधार कार्ड किंवा एटीएम कार्ड सारखे आकाराने लहान असल्याने रेशन कार्ड च्या जागी आपण ते वापरू शकतो.ई-रेशन कार्ड ची कॉपी मोबाईल मध्ये सेव्ह करू शकतो. रेशनशी संबंधित सरकारी योजना साठी अर्ज करणे यामुळे सोपे होईल.भविष्यातही रेशन कार्ड च्या संबंधित सर्व कामांसाठी डिजिटल ई रेशन कार्ड आवश्यक असणार आहे.या पुढील काळातही राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी ई -पिक नोंदणी तसेच ई-रेशन कार्ड यांसारख्या अनेकविध योजना ग्रामपंचायत राजुरी च्या सहकार्याने आम्ही राबवणार असल्याचे युवा नेते वल्लभ शेळके यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी केलेला हा एक अभिनव उपक्रम असून केलेले काम हे कौतुकास्पद व गौरवास्पद असल्याचे उदगार तहसीलदार डॉ.सुनील शेळके यांनी काढले.ई-रेशन कार्ड हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी गावच्या सरपंच प्रियाताई हाडवळे,उपसरपंच माऊलीशेठ शेळके,माजी सभापती दिपक शेठ औटी,
तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश औटी, ग्रामपंचायत सदस्य शाकीरभाई चौगुले,रंगनाथ पाटील औटी,अंकुश हाडवळे, पत्रकार राजेश कणसे,गणेश हाडवळे,निलेश हाडवळे यांनी सहकार्य केले.तसेच राजुरी गावचे तलाठी धनाजी भोसले, नितीन औटी,सचिन औटी,अनिल औटी,विनोद ताजवे यांनी ई-रेशनकार्ड प्रक्रियेबाबत मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.