जलदिना निमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन

1 min read

निमगाव सावा दि.२२:-जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील ग्रामपंचायत सभागृहात जलसंपदा विभागा मार्फत सध्या सुरू असलेल्या सिंचन सप्ताह निमित्ताने जलदिनाचे शुक्रवार दि.२१ ला आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जल देवतेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मीना शाखा कालवा अध्यक्ष तथा घोड, कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश वायसे हे होते.यावेळी अनेक वक्त्यांनी जलदिना निमित्ताने पाणी व त्याचे महत्व, पाण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी, पाणी वापर संस्था करणे का गरजेचे, इत्यादी माहिती सविस्तर विशद केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कालव्याद्वारे मिळणाऱ्या पाण्याबाबत व इतर ही गोष्टींबाबत अध्यक्ष वायसे यांच्या समोर काही प्रश्न उपस्थत केले. त्यावर वायसे यांनी मी शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न शासन स्तरावर, लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने सोडविण्याकामी सातत्याने प्रयत्नशील रहात असून यापुढे ही राहील असे आश्वासन उपस्थित शेतकऱयांना दिले.यावेळी सुभाष झिंजाड, कृष्णा चव्हाण, सुरज गुप्ता, पांडुरंग डुकरे, सुरेखा काटे, आधी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. जशी आपण पाण्याची मागणी करतो त्याचप्रमाणे जलसंपदा विभागाला पाणीपट्टी भरून सहकार्य करावे असे अध्यक्ष भाषणात वायसे यांनी आपले मत व्यक्त केले. पाण्याचा काटकसरीने वापर करून ठिबक सिंचन व तुषार सिंचन याचा जास्तीत जास्त वापर करावा असे यावेळी सांगण्यात आले.या कार्यक्रमास किशोर घोडे (सरपंच निमगाव सावा), अमित कुमावत (शाखा अधिकारी शिरोली/ जांबुत), प्रथमेश पाटील (शाखा अधिकारी टाकळी हाजी), कृष्णा चव्हाण (राज्य समन्वयक डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर), सुरज गुप्ता (प्रकल्प व्यवस्थापक), सुभाष झिंजाड (चेअरमन श्रीकृष्ण पाणी वापर संस्था), पांडुरंग डुकरे, सागर जाधव, नितीन चौधरी, ऋषिकेश बोडके, यावेळी मीना शाखा कालवा वरील सर्व पाणी वापर संस्थेचे चेअरमन संचालक सभासद शेतकरी विविध गावचे पदाधिकारी उपस्थित होते.जलसंपदा विभागातील या विभागाचे अनेक अधिकारी, आयटीसी मिशन,डीएससी संस्थेचे पदाधिकारी,गावचे सरपंच,परिसरातील पाणी वापर संस्थांचे अनेक पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, बचत गटांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.आलेल्या सर्वांचे स्वागत सागर जाधव यांनी तर आभार डीएससी चे नितीन चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी जल प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे