दुधाचे बाजारभाव वाढले अन् उन्हाळ्यामुळे उत्पादन घटले
1 min read
जुन्नर दि.२१:- जुन्नर तालुक्यासह सर्वत्र शेतीला जोड म्हणून शेतकऱ्यांकडून केला जाणाऱ्या दुग्ध व्यवसायाला बाजारभावाअभावी मागील काही वर्षांपासून घरघर लागली होती.
शासनाने दुधाचे बाजारभाव वाढविले. त्यामुळे शेतकऱ्यांची एक वर्षापासूनची प्रतीक्षा थांबली. मात्र,अंमलबजावणी होत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.गाई तसेच म्हैस यांच्या दुधाला बाजारभाव वाढवा,अशी मागणी चारा पाण्याअभावी जनावरांची आबाळ सध्या जनावरांना असह्य होणारा कडक उन्हाळा सुरू असल्याने जनावरांचे चारा खाण्याचे तसेच पाण्याचे प्रमाण कमी होते.
याचा परिणाम जनावरांच्या तब्येतीवर होऊन दूध देण्यास जनावर कमी पडते. परिणामी, दूध उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होत असते. वर्षानुवर्षे उन्हाळ्यात जनावरांची चारा-पाण्याअभावी आबाळ होत असते.वारंवार शेतकरीवर्गाकडून शासनाकडे होत होती.
राज्यभरात अनेकदा तर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शासनाने गायीच्या व म्हशीच्या दुधाला प्रतिलीटर दोन दर वाढले, पण अंमलबजावणी नाही.मागील एक वर्षापासून दुधाचा बाजारभाव वाढवावा, अशी मागणी शेतकरी वर्गातील होत होती. वर्षभरात बाजारभाव वाढले गेले नाही.
मात्र, ऐन उन्हाळ्यात दुभती जनावरे दूध देण्यास कमी पडली अन् दुधाचे दर वाढले. दर वाढले, पण अंमलबजावणी काही झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे बाजारवाडी येथील दूध उत्पादक शेतकरी उत्तम जगन्नाथ पोळ यांनी सांगितले.
रुपयांप्रमाणे बाजारभाव वाढवून दिला. मागील पंधरा दिवसांपासून बाजारभाव वाढले गेले. मात्र, झाली आहे. पावसाळ्यात जनावरांना हिरवा चारा मिळाल्याने जनावरांच्या दुधात चांगलीच वाढ होत असते. मात्र, उन्हामुळे जनावरे पाणी कमी पिते व चाराही कमी खात असल्याने दुधाचे उत्पन्न घटले आहे.
ऐन उन्हाळा आल्याने जनावरे चारा-पाणी खाण्यास कमी पडल्याने दूध उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट शासनाने घोषित केलेल्या दरपत्रकाप्रमाणे शेतकऱ्यांना लवकरात लवकर दुधाचे बाजारभाव देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.