निमगाव सावात उभारतोय २००० मॅट्रिक टन कांदा साठवून प्रकल्प; राज्याच्या ‘आत्मा’ टीमची भेट
1 min read
निमगाव सावा दि.२०:- ‘आत्मा’ महाराष्ट्र राज्य संचालक अशोक किरनळी व प्रकल्प संचालक ‘ आत्मा ‘ पुणे सुरज मडके यांनी जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील ‘श्री विघ्नहर कृषी प्रोडूसर कंपनी लिमिटेड’ या कंपनीत भेट देऊन कंपनीच्या सद्यस्थितीच्या कामाची पाहणी केली. तसेच भागधारकांशी संवाद साधला. कांदा पिक व काढणे पश्चात घ्यावयाची काळजी यावर अनुभव संचालकांनी सांगितला. यावर्षी बाजार भाव समाधानी असल्याचे सांगितले.
त्यासाठी कांदा साठवनुक चाळ अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. निमगाव सावा गावामध्ये होत असलेल्या प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे संचालकांनी सांगितले. हा श्री विघ्नहर कृषी प्रोडूसर कंपनीचा प्रकल्प 2000 मॅट्रिक टन कांदा साठवून होईल ही शक्यता मोठ्या क्षमतेचा आहे अशी माहिती कंपनीची संचालक व कृषी पदवीधर सचिन गाडगे यांनी दिली.यावेळी उपस्थित कंपनीचे संचालक गणपत गाडगे, शंकर काटे, सुभाष खरमाळे, नवनाथ जोरी, शांताराम ट्टू हे उपस्थित होते.
भेटीच्या वेळी आत्मा पुणे महाराष्ट्र राज्याचे संचालक अशोक किरनळी, आत्मा पुण्याचे संचालक सुरज मडके, जुन्नर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, व मंडल कृषी अधिकारी शिवकांत कोल्हे,
कृषी सहाय्यक राणू आंबेकर,सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सूर्यकांत विरणक व श्री विघ्नहर कृषी प्रोडूसर कंपनीच्या संचालक शेतकरी उपस्थित होते.
या वेळी शंकर काटे यांनी सत्कार करून सर्वांचे आभार मानले.