जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी उभे राहणार ‘रोप वे’; राज्य शासनाकडून प्रकल्पाला हिरवा कंदील, जुन्नर तालुक्यात पर्यटनाला मिळणार चालना

1 min read

मुंबई दि.२०:- अधिवेशन मुंबई विधानसभेत सुरू आहे. अशातच राज्य सरकारने रोप वे संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून राज्यातील ४५ ठिकाणी रोप वे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ८ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यासंबंधीची माहिती आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करत दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील ८ ठिकाणी रोप वे उभारण्याची जोर धरू लागली होती. अखेर राज्य शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेत रोप वे प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी, राजगड, सिंहगड या किल्ल्यांचा तर लेण्याद्री, दर्या घाट, भीमाशंकर, जेजुरी या धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी रोप वे प्रकल्प उभे राहिल्याने पर्यटन वाढण्यास मोठी चालना मिळणार आहे. असा दृष्टीकोन ठेवूनच राज्य सरकाने या प्रकल्पांना हिरवा कंदील दर्शवला आहे.’भाजपा महायुती’ सरकारच्या माध्यमातून राज्यात 45 रोप वे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात एकूण 8 ठिकाणांचा समावेश आहे. जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील राजगड, शिवजन्म स्थळ शिवनेरी, श्री क्षेत्र लेण्याद्री, दर्या घाट, श्री क्षेत्र भिमाशंकर ज्योतीर्लिंग, सिंहगड, श्री क्षेत्र जेजुरी, श्री क्षेत्र खंडोबा या ठिकाणी ‘रोप वे’ साकारणार आहेत. यामुळे पर्यटनास चालना मिळेल, असा विश्वास आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन मिळत आहे. महायुती सरकार…कामगिरी दमदार..! असे पोस्ट लिहित आमदार महेश लांडगे यांनी याविषयी माहित देत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे