पाण्यात बुडणाऱ्या ‘जय’ चे मित्राने वाचवले प्राण

1 min read

आळेफाटा दि.२०:- कुकडी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या अल्पवयीन मुलाचे प्राण त्याच्या मित्राने वाचवले. नेहरकरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. जय भगीरथ नेहरकर (वय १४) हा आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात उडी मारल्यावर खडकाच्या कपारीत जय अडकला. त्याच्या नाकाला मार लागल्याने नाकातून रक्त येत होते. रक्ताचे लाल बुडबुडे पाण्यावर आल्यावर मित्रांनी भीतीपोटी तेथून पळ काढला. त्याचवेळी प्रेम सचिन बर्डे (वय १५) हा मुलगा घराजवळ उभा होता. त्याने मुलांना विचारणा केली असता जय पाण्यात बुडाल्याचे त्यांनी सांगितले. प्रेमने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून खडकात अडकलेल्या जयला पाण्यातून बाहेर काढले परंतु तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला कृत्रिम श्वास शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळाने तो शुद्धीत आल्यावर प्रेम ने त्याला उचलून घरी नेले. व झालेला प्रकार सांगितला. घरच्यांनी लगेच त्याला नारायणगाव येथे दवाखान्यात नेले आता तो सुखरूप आहे. प्रेम च्या धाडसाचे, शौर्याचे सर्वत्र पंचक्रोशीत कौतुक करण्यात आले. शाळेच्या वतीने देखील त्याचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे