असे ओळखा इंजेक्शन देऊन पिकवलेलं टरबूज
1 min read
जुन्नर दि.२०:- कोणत्याही फळाचा रंग त्या फळाच्या सगळ्या भागात एकसारखा नसतो. त्यामुळे जे टरबूज सगळीकडून हिरवगार आहे, ज्यावर कुठेही पिवळट भाग नाही असं टरबूज घेऊ नका. ते इंजेक्शन देऊन पिकवलेलं असू शकतं. टरबुजाचा एक छोटासा तुकडा घ्या आणि तो तुकडा पाण्यामध्ये टाका. जर काही वेळाने पाण्याला गुलाबी रंग आलेला दिसला तर ते टरबूज इंजेक्शन देऊन कृत्रिमपणे लाल करण्यात आलेलं आहे. जे टरबूज गोड आहे, ज्याला रंगसुद्धा लाल आहे पण बिया पांढरट आहेत असं टरबूज घेणं टाळा. ते कृत्रिमपणे पिकवलेलं असतं. पुर्णपणे पिकलेल्या टरबुजाच्या बिया काळपट, चॉकलेटी असतात.
टरबुजाचे देठ पाहूनही त्याची परिक्षा करता येते. ज्या टरबुजाचे देठ हिरवे असूनही ते आतून लालबुंद असते असे टरबूज कृत्रिमपणे पिकवलेले असू शकते. कारण जे टरबूज नैसर्गिकरित्या पुर्णपणे पिकलेले असते त्या टरबुजाचे देठ वाळलेले असते.