आंतरराष्ट्रीय खेळाडू उर्मिला पाबळे हिचा भव्य नागरी सत्कार

1 min read

जुन्नर दि.१८:- जुन्नर तालुक्याची सुकन्या व आंतरराष्ट्रीय खेळाडू उर्मिला जितेंद्र पाबळे हिने खेलो इंडिया या गुलबर्ग काश्मीर येथे झालेल्या स्नो बोर्डिंगच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. स्नो बोर्ड स्पर्धेत राज्यासाठी रौप्य पदक पटकविल्याबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडू कु उर्मिला जितेंद्र पाबळे हिचा तिचे मूळगाव असलेल्या पाबळवाडी सावरगाव पंचक्रोशीच्या वतीने भव्य नागरीक सत्कार करण्यात आला. तसेच राजे प्रतिष्ठान पाबळवाडी व ग्रामस्थ मंडळी यांच्या मार्फतही तिला सन्मानपत्र देऊन तिचा सत्कार करण्यात आला. दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच प्रतिकुल परिस्थितीवर मात करून उर्मिला हिने जिद्द व चिकाटीने हे उज्वल यश मिळवले आहे. सध्या ती ऐरोली नवी मुंबई येथे राहत असून खेळानिमित्त अनेक देशांतील विविध स्पर्धांमध्ये तिने पारितोषिक मिळविले आहे. या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, अरुण पारखे, रामदास नायकोडी, खंडेराव शिंदे, महादेव बाळसराफ, प्रियंका शेळके, महेश शेळके , संतोष जाधव, दिपक बाळसराफ, दिलीप खिलारी, अभिषेक वर्पे, शंकर कचरे, प्रदीप थोरवे, महेंद्र धोंडकर, प्रकाश गिदे, विकास जूंदरे, क्रांती चव्हाण, शंकर कचरे, रुपेश जाधव सह विविध गावचे सरपंच व पदाधिकारी मान्यवर व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने हजर होते. तसेच राजे प्रतिष्ठान नारायणगाव येथे शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील व भाजपा नेत्या आशाताई बुचके यांच्या हस्ते उर्मिला पाबळे हिचा विशेष सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे