बोरी बुद्रुक ज्ञानेश्वर नगर येथे अढळली बिबट्याची पिल्ले 

1 min read

बोरी दि.१७:- बोरी बुद्रुक ज्ञानेश्वर नगर येथे रविवार दि.१६ पहाटे दोन बिबट्या ची पिल्ले पिंजऱ्यात जेरबंद झाली. ज्ञानेश्वर नगर मधील चारणबाबा मंदिर परिसरात शांताराम बाळाजी कोरडे व प्रसाद कोरडे (मेजर) यांच्या शेतात दि.१४ रोजी ग्रामस्थांच्या पुढाकाराने पिंजरा लावण्यात आला होता.

रविवारी सकाळी शेतकरी श्रीमंता कोळी मामा शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता पिंजऱ्यात दोन पिल्ले अडकली अशी प्राथमिक माहिती त्यांनी चारण सेवा मंडळाच्या सहकार्यांना दिली. तात्काळ सर्व सहकारी घटनास्थळी जमले व वनविभागाला कळवून वनविभागाने बिबट्या ची पिल्ले सुरक्षित ठिकाणी माणिकडोह वन निवारा केंद्र या ठिकाणी हलवण्यात आले आहे.

पिल्लांची आई (मादी) आणि नर त्याचबरोबर अजुन एक पिल्लू याच विभागात आहे असे ग्रामस्थ सांगतात. याच ठिकाणी सांयकाळ पर्यंत दुसरा पिंजरा लावून मादी टॅप करुन जेरबंद करु असे आश्वासन वनविभागाने दिले आहे. पिल्लांना त्यांच्या आई पर्यंत पोहचवण्यासाठी वनविभाग प्रयत्न करत आहे.

अशी माहिती शैलेश महाराज कोरडे यांनी दिली आहे.यावेळी चारण सेवा मंडळाचे अध्यक्ष विश्वस्त तसेच ग्रामस्थ यांनी मोठे सहकार्य केले. अधिक माहितीसाठी वनविभागाशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे