निमगाव सावात सोमवारी लोकशाही दिन; स्थानिक प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही

1 min read

निमगाव सावात दि.१४:- नागरीकांना विविध योजना उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्या स्थानिक प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी जुन्नर तालुका स्तरीय लोकशाही दिवस आयोजित करण्यात आला असून. सोमवार दि.१७ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत निमगांव सावा सभागृह येथे या महिन्याच्या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. सदरच्या लोकशाही दिनामध्ये सर्व शासकिय विभागांचे कार्यालय प्रमुख / प्रतिनिधी उपस्थित राहून. प्राप्त होणा-या अर्जाबाबत आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात येणार आहे. तसेच यापुर्वी प्रलंबित असलेल्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करणेसाठी संबंधित अर्जदार यांनी उपस्थिती नोंदविणेबाबत तहसील कार्यालयामार्फत नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे. सदरच्या लोकशाही दिनाकरीता सनियंत्रण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सिध्दार्थ भंडारे भूसंपादन क्रमांक २६ यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. अशी माहिती तहसीलदार सुनील शेळके यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे