पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख आणि सरकारी नोकरी; सरकारची मोठी घोषणा
1 min read
मुंबई दि.२९:- पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या मृतांमधील प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर राज्यातील सहा मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये
अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. तसेच प्रत्येक कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कुटुंबांच्या शिक्षण,रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शोकांतिकेप्रती संवेदना व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे.
राज्य सरकार या कुटुंबांच्या शिक्षण, रोजगार आणि पुनर्वसन याकडे विशेष लक्ष देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पहलगाम हल्ल्यात आपले कुटुंब गमावलेल्या जगदाळे कुटुंबातील एका मुलीला शासकीय नोकरी देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्रीपदाचा विशेषाधिकार वापरत सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून हल्ल्यातील इतर पीडित कुटुंबांनाही शक्य त्या सर्व प्रकारची मदत दिली जाणार आहे.