महिलेच्या पोटातून तब्बल साडेपाच किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश
1 min read
शिरूर दि.२९:- शिरूर येथील श्री गणेशा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये अतिशय गुंतागुंतीची व क्लिष्ट शस्त्रक्रिया पार पडली असून महिलेच्या पोटातून तब्बल साडेपाच किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील एका गावातील ५० वर्षीय महिलेला पोटाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी शिरूर येथे धाव घेत श्री गणेशा हॉस्पिटल मध्ये तपासणी केली होती.यावेळी हॉस्पिटल चे संचालक डॉ.अखिलेश राजूरकर व डॉ.विशाल महाजन यांनी गाठ असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर अधिक तपासण्या केल्या असता पोटातील गाठ तत्काळ काढणे गरजेचे होते.मात्र सदर रुग्णाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने व ही शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने पुणे येथे उपचार करणे कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होते.
यावर पुणे येथील शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना श्री गणेशा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कमी खर्चात शस्त्रक्रिया करावी याबाबत विनंती केली व त्यांनीही ते मान्य केले.
यानंतर शिरूर येथे नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली. अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून महिलेच्या गर्भाशयातून तब्बल साडेपाच किलो वजनाची,
12×22×26 सेमी आकाराची गाठ यशस्वीरीत्या काढण्यात डॉक्टरांना यश आले.सध्या रुग्णाची परिस्थिती व्यवस्थित आहे.रुग्णाच्या कुटुंबीयांनी शिरूर येथील सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहे.ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी पुणे येथील कॅन्सर तज्ञ डॉ.भूषण भळगट यांनी मेहनत घेतली.
तर डॉ.अखिलेश राजूरकर, डॉ.विशाल महाजन, भूलतज्ञ डॉक्टर रवी जाधव, डॉ.सारंग पाठक, डॉ.सौरव पाठक, डॉ.सागर केदारे, डॉ.अंकित महाजन, डॉ.अक्षय काळे यांसह वैशाली पडवळ, शिल्पा झंजाड, संभाजी जवळगे, नीता कदम, संगीता कोल्हे, युवराज उंडे यांसह हॉस्पिटल सर्व स्टाफने मेहनत घेतली.