औरंगजेबची कबर काढून टाकण्यासाठी निघणार सासवड ते खुलताबाद रॅली
1 min read
पुणे दि.१५:- औरंगजेब याने निधनानंतर खुलताबाद येथे कवर बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्या ठिकाणी ही कबर आहे.
वास्तविक तो भारतीय नसल्याने त्याची कबर काढून टाकावी, या मागणीसाठी सासवड ते खुलताबाद अशी रॅली आयोजित केल्याची माहिती छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे नितीन पोटे आणि मिलिंद एकबोटे यांनी दिली. ही रॅली शनिवारी (दि. १४) सनदशीर मार्गाने सार्वजनिक शांतता व व्यवस्था यांचा भंग न करता काढण्यात येणार आहे.