केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी यशस्वी
1 min read
नवीदिल्ली दि.१४:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे. त्याबाबतची घोषणा फडणवीसांनी केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची ही दिल्लीवारी यशस्वी झाल्याची चर्चा आहे. आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आयआयसीटी उभारण्यात येणार आहे. आयआयसीटीसाठी फिल्म सिटीत जागा देण्यात येणार, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
केंद्र सरकार आयआयसीटीसाठी 400 कोटी देणार आहे, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.आयआयटी जशी आहे तशी आयआयसीटी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिली आयआयसीटी मुंबईत तयार होणार आहे.
आपल्या गोरगाव फिल्मसिटी येथील जागा निश्चित केली आहे. केंद्र सरकार त्यावर 400 कोटी खर्च करत आहे. त्यामुळे कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रातलं टेक्नोलॉजीतल्या सर्व गोष्टी या आयआयसीटीच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध असतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला आहे. गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे.
या दृष्टीने गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली.
यामुळे विमानतळ कामातील अडसर आता लवकरच दूर होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, असाही एक विषय या चर्चेत होता. या सर्व बाबतीत सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 1 ते 4 मे या कालावधीत मुंबईत ही समिट होणार आहे.
याचनिमित्ताने मुंबईत आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) सुद्धा स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी सुद्धा केंद्र सरकार निधी देणार आहे, त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.