जुन्नरच्या उर्मिला पाबळे ने स्नो बोर्डिंग स्पर्धेत पटकवले रौप्य पदक; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
1 min read
जुन्नर दि.१२:- शिवजन्मभूमीची जुन्नर तालुक्याची कन्या आंतरराष्ट्रीय खेळाडू उर्मिला जितेंद्र पाबळे खेलो इंडिया या गुलबर्ग येथे काश्मीरमध्ये होणाऱ्या स्नो बोर्डिंग च्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. मूळची पाबळवाडी सावरगाव तालुका जुन्नर येथील असलेली लहानपणीच पितृछत्र हरपलेली उर्मिला ही लहानपणापासूनच अतिशय जिद्दी व मेहनती मुलगी आहे. सध्या एरोली नवी मुंबई येथे राहत असून खेळानिमित्त अनेक देशांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये तिने पारितोषिके पटकाविले आहे. तिच्या खेळा संदर्भातील रील जगभर प्रचंड व्हायरल होत असतात.
तिच्या या यशाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.आपल्या दिवंगत वडिलांचे सप्न साकार करण्यासाठी उर्मिलाने प्रचंड मेहनत घेतली आहे. जगभर तिची या खेळाद्वारे मोठी प्रसिद्धी झालेली असून तिच्या व्हिडिओ ला मिलियन व्ह्यूज येत असतात. सर्व जुन्नर तालुक्यासह जगभरातून तिच्या चाहत्यांचा या यशासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.