श्री साईकृपा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सदाशिव बोरचटे यांची निवड

1 min read

बेल्हे दि.१४:- पुणे व अहमदनगर कार्यक्षेत्र असण्याऱ्या श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्या बेल्हे (ता.जुन्नर) या संस्थेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक मंगळवार दि.११ रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय जुन्नर येथे मा डॉ. गजेंद्र देशमुख (अध्यासी अधिकारी, सहाय्यक निबंधक) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.13 संचालकांमधून सदाशिव रामभाऊ बोरचटे यांनी अध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला त्यास सूचक म्हणून राकेश सुदाम डोळस तर सूर्यकांत आबाजी गुंजाळ पाटील यांनी अनुमोदन दिले व उपस्थित 12 संचालकांमधून बोरचटे यांची बिनविरोध अध्यक्ष पदी नियुक्ती केली. या आधी वसंत जगताप हे अध्यक्ष होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे