विशाल जुन्नर फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न

1 min read

आळे दि.७:- आळे येथील विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे IPA आळेफाटा लोकल ब्रांच च्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात पार पडली.

या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली यावेळी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष,अंकुश सोनवणे विशाल जुन्नर सेवा मंडळाचे विश्वस्त विक्रांत काळे व महेंद्र काळे, विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सीईओ तसेच आय पी ए आळेफाटा लोकल ब्रांचचे अध्यक्ष डॉ.डी.डी.गायकवाड, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी प्राचार्या डॉ. आर.ए. हांडे, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी फोर वुमन प्राचार्या डॉ. ए. एस ताजवे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व इतर महाविद्यालयीन शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रोफेसर, डॉ. विशाल मोरे , अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीचे असोसिएट प्रोफेसर, डॉ. महेश देशपांडे परीक्षक म्हणून लाभले. डॉ. महेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेबद्दल मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी संशोधन उपक्रम राबवावे असे आवाहन केले. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे उद्घाटन झाले. डॉ. विशाल मोरे व डॉ. महेश देशपांडे यांनी स्पर्धेतील ८ बी फार्मसी कॉलेज तर ९ डी फार्मसी कॉलेज यातील एकूण ५० विद्यार्थ्यांच्या पोस्टरचे परीक्षण केले.या स्पर्धेमध्ये डी. फार्मसी कॉलेज मधून व्ही. जे. एस. एम. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी फोर वुमन आळे च्या खान हुजेफा व साळवे कृतिका या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळविला तसेच व्ही. जे. एस. एम.इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आळे च्या गुंजाळ अमन व हुले पायल या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे च्या आरोटे धनश्री व मोरे वैष्णवी आणि मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी अकोले च्या शेळके ऋषिकेश या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविला.बी. फार्मसी मधून समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे च्या प्रतीक्षा दिनकर व ऐश्वर्या गोवडा या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला तसेच समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे च्या आदित्य डेरे व मेहेर तांबोळी या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे च्या अभिषेक कोळी व सानिका साळुंखे आणि सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर च्या आयेशा कुरेशी व विकी होगे या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविला.या स्पर्धेत विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती भुजबळ यांनी केले तर आभार अक्षदा हुलवळे यांनी मानले तसेच कार्यक्रम समन्वयक म्हणून साहिल शेख व रेश्मा लोंढे यांनी कामकाज पाहिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे