समर्थ संकुलात पदवी प्रदान समारंभ संपन्न
1 min read
बेल्हे दि.७:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे या डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत औषधनिर्माणशास्त्र पदवी महाविद्यालयामध्ये नुकतेच पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयीन पातळीवर प्रथमच अशा स्वरूपातील पदवीप्रदान समारंभाचे आयोजन होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा क्षण म्हणून याची नोंद होणार असल्याचे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी सांगितले.
समारंभाच्या आरंभी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीच्या अग्रभागी महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांनी विद्यापीठाचा ध्वज हाती घेतला होता.या मिरवणुकीत प्रमुख अतिथी, प्राचार्य, स्थानिक समिती सदस्य व सर्व पदवीप्राप्त विद्यार्थी सहभागी झाले होते.सभागृहात मिरवणुकीचे आगमन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.त्यानंतर विद्यापीठ गीताने समारंभाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी सहाय्यक आयुक्त, (एफडीए) विलास तासखेडकर उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तासखेडकर म्हणाले की,या खाजगीकरणाच्या युगात सरकारी नोकरी करणे हे विद्यार्थाचे ध्येय असले पाहिजे.त्यासाठी विविध विषयांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे.स्पर्धा परीक्षा मध्ये स्वतःला सिद्ध करणे तितकेच आवश्यक असते.बी.फार्मसी नंतरच्या उच्च शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांना यावेळी माहिती दिली.
मार्केट मध्ये सध्या असणाऱ्या कौशल्यपूर्ण शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याची किती गरज आहे यासंबंधीची विस्तृत माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.एफडीए अंतर्गत असलेल्या ड्रग इन्स्पेक्टर,रसायन शास्त्रज्ञ,तांत्रिक सहाय्यक,सहाय्यक आयुक्त यांसारख्या आणि इतर सरकारी नोकरी संधीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
महाविद्यालयामध्ये आमूलाग्र बदल झाला असून भौतिक सुविधांबरोबरच शैक्षणिक सामंजस्य करार,तांत्रिकदृष्ट्या सक्षमीकरणाकडे वाटचाल करत महाविद्यालयाने भरीव कामगिरी केल्याबद्दल माजी विद्यार्थ्यानी अभिनंदन केले व शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले.
यावेळी ११७ पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीक्षाविभाग प्रमुख डॉ.राहुल लोखंडे,प्रा.सुजीत तांबे,माजी विद्यार्थी मेळावा समन्वयक डॉ.शीतल गायकवाड,प्रा.मनिषा कसबे तसेच द्वितीय व तृतीय वर्ष बी.फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी नियोजन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,
प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,विभागप्रमुख डॉ.सचिन दातखिळे,प्रा.नितीन महाले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्राची पडवळ यांनी केले, प्रास्ताविक समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके यांनी केले. प्रा.शुभम गडगे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे मानले.