टाकाऊ पासून टिकाऊ ! लोखंडी स्क्रॅप मटेरियल चा वापर करून विद्यार्थ्यांसाठी सायकलचे स्टॅन्ड चे शेड

1 min read

शिरोली दि.७:- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली – सुलतानपूर बोरी या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या उपलब्ध लोखंडी स्क्रॅप मटेरियल चा वापर करून विद्यार्थ्यांसाठी सायकलचे स्टॅन्ड चे शेड बनविण्यात आले. शाळेतील दोन वर्ग खोल्यांच्या कामातून शिल्लक राहिलेले लोखंडी पाईप पत्रे यांचा पुनर्वापर करून अगदी कमी खर्चात विद्यार्थ्यांसाठीचे स्टॅन्ड विद्यालयामार्फत तयार करण्यात आले. या स्टॅन्ड चा उपयोग उन्हाळ्यात व पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या सायकल सुरक्षित राहण्यासाठी होणार आहे. सदर सायकल स्टॅन्ड चे अनावरण विद्यालयामध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी गावच्या सरपंच प्रिया खिलारी उपसरपंच दत्तात्रय डावखर, शाळा व्यवस्थापन समितीचे सुभाष खिलारी, माजी अध्यक्ष राजू पोळ तसेच ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सदस्य बाजीराव मुळे, व गेनभाऊ सहाने, अजित खिलारी, दत्तात्रेय सातपुते, रमेश सोनवणे, आशा डावखर, आयुब मणियार, आदर्श शिक्षक शिवराम गुंजाळ तसेच राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक रामभाऊ सातपुते गुरुजी, निवृत्ती डावखर, पत्रकार निलेश गाडगे व पत्रकार सुनिल गहिणे, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सुभाष हांडे, योगेश शेळके, उषा भारती, कसाळ मयूर, अमन मणियार उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र बोऱ्हाडे यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने तसेच लोक सहभागातून आतापर्यंत शाळेची भौतिक सुविधा वाढविण्यासाठी जी जी काम झालेले आहेत त्या सर्वांचा उल्लेख केला. विद्यालयात सदोदित वेळेला हजर व मदतीसाठी तत्पर म्हणजेच व्यवस्थापन चे माजी अध्यक्ष राजू पोळ होय. असे विशेष कौतुक मुख्याध्यापकांनी केलं. तसेच यावेळी इयत्ता दहावीतील विद्यार्थी आदित्य निवृत्ती डावखर याच्या छोट्याशा अपघाताचा खर्च विद्यार्थी अपघात निधी योजनेअंतर्गत एकूण रक्कम दहा हजार रुपये चा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. सदर विद्यार्थ्याला विद्यार्थी अपघात निधी अर्थसहाय्य योजने अंतर्गत सेवक कल्याण निधीचे जुन्नर तालुक्यातील संचालक व विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र बोऱ्हाडे यांनी हा निधी मिळून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामभाऊ सातपुते गुरुजी यांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधा बरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी मुख्याध्यापक व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल कौतुक केले. विशाल ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा अविनाश दगडू डावखर व अर्जुन दगडू डावखर यांच्या सौजन्यातून विद्यार्थी विद्यार्थिनींना दोन कागदी ताडपत्री विद्यालयास सप्रेम भेट देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख एम. एम.बोऱ्हाडे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे